मुरबाड-शहापूर-कशेळे-कडाव-कर्जत-चौक-लोहोप रस्त्याचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न!
ज्ञानेश्वर बागडे-कर्जत
आमदार महेंद्र यांच्या कार्यकाळात अनेक विकासात्मक कामे मतदार संघात चालू आहेत. याच मंजूर कामांपैकी काही कामांचे भूमिपूजन आमदार महेंद्र थोरवे यांच्या पार पडत असून आज दिनांक १२ डिसेंबर रोजी मुरबाड-शहापूर-कशेळे-कडाव-कर्जत-चौक-लोहोप रस्त्याचे (राज्यमार्ग ७९) आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले. सदर मार्ग कर्जत वरून पनवेल करीता जाण्याकरिता महत्वाचा असून यामुळे रस्त्याचे काम अत्यंत चांगले महत्वाचे समजले जात आहे..
या भूमिपूजन प्रसंगी माझी उपसभापती श्याम भाई साळवी, जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, पंकज पाटील ,नगरसेवक संकेत भासे,वावरले ग्रामपंचायत सरपंच प्रिंतेश मोरे, प्रफुल विचारे आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते...