महाराष्ट्र मिरर टीम
कर्जत मतदार संघात अजून पर्यंत शांततेत प्रचार सुरू असताना आज कडाव बाजारपेठेत प्रचाराला गालबोट लागले असून थोरवे यांच्या कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करून मोठा वाद होताना टळला आहे.महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांचा प्रचार सुरू होता आणि परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सुधाकर घारे यांचे कार्यकर्ते कडावमध्ये प्रचार करत असताना दोन्ही गट आमनेसामने आले.यावेळी नसरापूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मनोहर पाटील हे सुधाकर घारे यांचा प्रचार करत असताना आमदार महेंद्र थोरवे आणि पाटील यांच्यात शाब्दिक चकमक उडाली नंतर मनोहर पाटील हे आमदारांना हात जोडून विनंती करत होते की मला धमकी देऊ नका. आता आमदार थोरवे यांनी पाटील यांना काय धमकी दिली हे मात्र अजून समजू शकलेल नाही.आता सोशल मीडिया वर जो व्हिडिओ व्हायरल होत आहे.त्यात आमदार महेंद्र थोरवे यांनी अर्वाच्य भाषेत त्यांनी पाटील यांना सुनावल्याचे स्पष्टपणे
ऐकावयास मिळत आहे.यासंबधी दोन्ही बाजूकडून काय प्रतिक्रिया येतात हे पाहावे लागेल.