सुधाकर घारेंना मनसेचा पाठिंबा !!!
संतोष दळवी - कर्जत
कर्जत मतदार संघातील महायुतीचे बंडखोर उमेदवार सुधाकर घारे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठींबा मिळवण्यात यशस्वी झाले असून आता सुधाकर घारे यांचे पारडं जड झालं आहे.
राष्ट्रवादीतून उमेदवारी न मिळाल्याने आपला अर्ज कायम ठेवत महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांना जबर आव्हान देत सुधाकर घारे यांची ऑटो रिक्षा सुसाट सुटली असून आज घारे यांनी कृष्णकुंज गाठत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पाठींबा मिळवला आहे.यावेळी मनसेचे रायगड जिल्हा अध्यक्ष जितू पाटील आणि परिवर्तन विकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.