Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

भाजपात वाद उफाळला,गटातटाचे राजकारण सुरू!

भाजपात वाद उफाळला,गटातटाचे राजकारण सुरू!
संतोष दळवी - कर्जत
रायगड जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यात भाजप मध्ये संघर्ष सुरू असून कोण मोठा अशी अहमिका लागली असून पक्षांर्गत उघड उघड एकमेकाच्या बदनामीचे षडयंत्र सुरू आहे.याची सुरुवात जिल्हा मुख्यालय असलेल्या अलिबाग मधून  झाली आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार दिलीप भोईर यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरल्या नंतर भाजप मधल्या वरिष्ठांनी त्यांच्या अनेक प्रकाराने मिनतवाऱ्या केल्या पण ते बधले नाहीत.आणि त्यांनी फॉर्म कायम ठेवल्याने भाजप मध्ये गटातटाचे राजकारण सुरू असल्याचे स्पष्ट झालं आहे. वरकरणी कारवाई करत त्यांना भाजपची सहा वर्षांसाठी दारे बंद करण्यात आली.कर्जतमध्ये तीच अवस्था पण ती जरा वेगळी.बंडखोर म्हणून किरण ठाकरे यांनी फॉर्म भरला आणि वरिष्ठांच्या सांगण्यावरून मागे सुध्दा घेण्यात आला.यावेळी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या घरी मीटिंग झाली त्यावेळी किरण ठाकरे यांनी अर्ज मागे घेण्याचे ठरले त्याच बरोबर जिल्ह्याध्यक्ष बदलाची मागणी करण्यात आली.यावेळी जिल्हा कार्यकारणीचे अनेक लोक उपस्थित होते.जिल्हाध्यक्ष बदलीवर निवडणुकी नंतर चर्चा किंवा निर्णय घेण्यात येणार होता मात्र या वादावर भाजपचे पनवेलचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी प्रचारादरम्यान तोंड फोडल्याने निवडणुकीनंतर भाजप जिल्हा कार्यकरणीत बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे .आमदार प्रशांत ठाकूर यांनी कर्जत खालापूर विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांच्यावर अनेक आरोप केले .तालुका आणि जिल्हा पातळीवरील पदाधिकारी एकमेकावर असे आरोप करू लागल्याने भाजप मध्ये आलबेल नसल्याचे उघड झालंय.आमदार प्रशांत ठाकूर यांनी जे आरोप केले आणि त्यांना किरण ठाकरे यांनी जी पुराव्यासहित पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं त्यावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अजून यावर उत्तर दिलं नाही.किरण ठाकरे हे सामान्य भाजप कार्यकर्ते असतानाच त्यांना मंत्री रविंद्र चव्हाण यांनी शंभरेक कोटीहून अधिक विकासकामे दिली आणि त्यांनी ज्यांना कोणाला वाटली तीच लोकं किरण ठाकरे यांच्या मागे नामनिर्देशन पत्र दाखल करताना शक्तिप्रदर्शनाच्या रूपाने त्यांच्या सोबत ठाम उभे राहिल्याने जुन्या गटातील लोकांना हे खटकल ही कालच आलेलं पोरगं काना मागून येऊन तिखट होत आहे.याआधी भाजपची सत्ता होती मंत्री चव्हाण यांच्या सोबत जानपहेचान होती आपल्याला इतकी विकास कामे आणता आली नाही शिवाय शक्ति प्रदर्शन करताना इतकी गर्दी गोळा करता आली नाही. याचं शल्य त्यांना बोचत राहिलं आणि तिथून उभा राहिला आरोप करण्याचा शिलशिला.किरण ठाकरे यांनी भाजप वाढवण्याच्या दृष्टीने उचलेल हे पाऊल मतांची टक्केवारी वाढण्याच्या प्रयत्नात असताना पक्षांतर्गत त्यांचे पंख छाटण्याचे प्रकार सुरू झाले.कर्जत मध्ये भाजपचा दुरून गंमत बघणारा एक गट,अर्ध क्रियाशील एक गट आणि एक क्रियाशील गट असे तीन गट असताना किरण ठाकरे यांना कर्जत खालापूर मतदार संघाचे प्रमुख हे पद देण्यात आलं.ठाकरे यांनी पक्ष वाढीचे प्रयत्न सुरू केले.मंत्री रविंद्र चव्हाण यांनी त्यांना भाजपची  शक्ति दिली. किरण ठाकरे यांनी पक्ष वाढवला.हे वरिष्ठांच्या लक्षात आलं आणि आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती,ग्रामपंचायत निवडणुका कर्जत मध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय झाला तसे किरण ठाकरे यांनी घोषितही केलं आहे.दरम्यान प्रशांत ठाकूर आणि किरण ठाकरे यांच्यात सुरू झालेलं शीतयुद्ध निवडणुकीच्या तोंडावर झाल्याने मोठी खळबळ माजली आहे.हे पक्षांतर्गत सुरू असलेलं शीतयुद्ध पक्ष वाढण्याच्या दृष्टीने मारक असून मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज सायंकाळी पनवेल येथे एका बैठकीचे आयोजन केलं असून त्यात हा विकोपाला गेलेला वाद मिटण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies